अस्तित्व
- Abhi Gune
- Jul 27
- 1 min read
इतिहासाचे अपूर्ण ज्ञान आणि भविष्याशी तोडलेल नात माणसाला वर्तमानापासून दूर नेहून ठेवत.
वर्तमानाच्या गाडीत तुम्ही भूतकाळाच इंधन घालून भविष्याच्या मार्गाला लागू शकता. इंधन तर भविष्याच पण करता येत, पण त्यान फक्त तुम्ही जागीच फिरक्या मारत राहता कारण काही केल तरी भूतकाळात परत जाता येत नाही. इंधन भूतकालाचाच बनत आणि मार्ग नेहमी भाविश्याकडेच जातो. भूतकाळात हरवणारे तो फक्त मंद गतीने पार करतात किव्हा वाटेत हरवून जातात.
कारण रेअर वियु मिरर मध्ये बघत पुढे जाण अवघड असत.
काळाची लाट सगळच बदलते. विरोध करणारे बुडतात, धडपडणारे स्वतःला सावरतात पण फक्त पुढे उभे राहणारे लाटेला समजून त्यावर स्वचंद स्वार करतात.
अस्तित्वाचे प्रश्न दुसऱ्यांच्या प्रवचनाने नाही तर स्वतःच्या अनुभूतीने सोडवणे महत्वाचे असते, नाहीतर माणूस वेळे आधीच इतिहास जमा होतो आणि देवापेक्षा जास्त पंडिताच्या पाया पडत राहतो.




Comments